मुंबई : हे सरकार म्हणजे गद्दारांच सरकार आहे, बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर काल जळगावात केली.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला. बोटीमध्ये एके 47 रायफल सापडल्या. मात्र या 40 गद्दारांना त्याचे काही घेणं देणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी हे गेले आहेत, यांना महाराष्ट्राचं या महाराष्ट्रातील जनतेचे काहीच घेणे-देणे नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहभागी मंत्र्यांवर, आमदारावर टीका केली. त्यामुळे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. तर हे सरकार म्हणजे गद्दारांच सरकार आहे, बेईमानांच सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी टीकाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
- 33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली.
शिवसेनेसोबत या बंडखोर आमदारांनी उठाव केला, क्रांती केली असं हे सांगत आहेत. यांनी केलेली या गद्दारीला हे बंडखोर क्रांती म्हणत असून त्याची इतर देशांनी दखल घेतल्याचे सांगत आहे. मात्र 33 देशांनी क्रांतीची नाही तर गद्दारांची नोंद घेतली. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी आमदारावर केली.



