नवी दिल्ली, दि. २१ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. सिसोदिया प्रकरणानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार रोज सीबीआय आणि ईडीचा खेळ सुरू करते अशात देशाची प्रगती कशी होणार, असा सवाल यावेळी केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी याबाबत एक ट्रिट केलं आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, सामान्य माणूस महागाईशी झुंज देत आहे, कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसह बेरोजगारी व महागाईशी लढले पाहिजे. त्याऐवजी ते संपूर्ण देशाशी लढत आहेत. सरकार रोज सकाळी सीबीआय ईडीचा खेळ सुरू करतंय, अशात देशाची प्रगती कशी होणार?
आप पक्षाने शनिवारी आरोप केला की, भारतीय जनता पक्ष दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबद्दल सतत खोटे बोलत आहे या आशेने की एक दिवस लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतील.
आप म्हणाले की, सिसोदिया यांच्या घरावर १५ तासांच्या सीबीआयच्या छाप्यामध्ये आणि देशभरात ३० ठिकाणी छापे टाकून काहीही मिळाले नसल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले.




