नांदेडमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या भेटीनंतर आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शाखाली मी अनेक वर्ष कामं केलं आहे. आजही मी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. आमच्यात कोणतीही कटूता नाही, कटूता असती मी त्यांची भेट घेतली नसती”, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.



