पिंपरी : कासारवाडीतील ॲटलास कॉपको बस स्टॉपवर प्रवाशांना उतरविण्यासाठी पीएमपीएमएल बस २२ ऑगस्टला मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान थांबली होती. त्यावेळी अनोळखी तीन इसम बसमध्ये चढले. फिर्यादीला व बस ड्रायव्हरला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण करून ३३५५ रुपये रोख रक्कम जबरदस्ती घेऊन पळ काढला.
हेमंत पेठे (वय ३८, रा. माळवाडी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार चव्हाण (वय २० वर्षे, रा. फुगेवाडी) व कुणाल कालेकर (वय २६ वर्षे, रा. फुगेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.




