मुंबई : आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यावरुन आमदार बच्चू कडूंवर खोचक टीका केली आहे. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही” असं म्हणत राणा यांनी बच्चू कडूंना चिमटा काढला आहे. “ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया” असा टोलाही राणा यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमादरम्यान लगावला आहे.
शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता रवी राणा यांनी या पैशांवरून बच्चू कडूंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी “गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला होता.



