मुंबई : नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ९ ऑगस्ट रोजी पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तब्बल सव्वामहिना रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार, संजय राठोड या आमदारांना संधी दिल्यामुळे आणि महिलांना संधी न दिल्यामुळेही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना राज्य सरकारने सरकारी बंगल्यांचे वाटप केले आहे.
कुणाला मिळाले कोणते बंगले?
मंत्री तानाजी सावंत – उदय सामंत – मुक्तागिरी
संदीपान भुमरे – सिंधुरत्नदादा भुसे – अब्दुल सत्तार – पन्हाळगड
दीपक केसरकर – रामटेक
शंभूराज देसाई – पावनगड
संजय राठोड – शिवनेरी
गुलाबराव पाटील – जेतवन
मंत्रीगिरीश महाजन – सेवासदन
चंद्रकांत पाटील – ए-९ लोहगड
सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन
अतुल सावे – शिवगड
रवींद्र चव्हाण – रायगड
विजयकुमार गावित – चित्रकूट
मंगलप्रभात लोढा – सिंहगड
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर – शिवगिरी



