रत्नागिरी: शिवसेनेच्या नेतेपदी निवड होताच भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, असं शल्य भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी, असं मतही जाधव यांनी व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत टीका केली होती.
याला भास्कर जाधव यांनी प्रयत्युत्तर जोरदार दिलं. आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. मात्र, शिवसेना एकासोबत कायम राहिली. त्यांच्या सारखा आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.



