जळगाव: मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केली आहे.
दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे. बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो असे विधानही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केले आहे.



