औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटातील आमदारांमध्ये संदीपान भुमरे यांचा सामावेश होता. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार खैरे यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. खैरे हा गावठी मंत्री असून त्याला काही कळत नाही असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पैठण येथील एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेच्या एकूण आमदार आणि खासदारांपैकी जास्तीत जास्त आमदार, खासदार आमच्या कडे आहेत. मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कुणाची? असं म्हणत पक्षाचे चिन्हही लवकरच आम्हाला मिळेल असंही ते बोलताना म्हणाले होते.



