पिंपळे सौदागर येथील तुषार रेसिडेंसी मधील नागरिकांच्या आरोग्य समस्यांचा विचार करून एकत्रितरित्या सर्व वयोगटातील लोकांसाठी सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे यांनी मेगा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, तसेच हिमोग्लोबिन या टेस्ट मोफत करण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्य समस्यांची माहिती व्हावी जेणेकरून त्यांना योग्य तो उपचार करण्यासाठी मदत व्हावी हा प्रयत्न करण्यात आला आहे. या शिबिराला सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत हे शिबिर यशस्वी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिता संदिप काटे, चेअरमन नितीन कोंडालकर, अनिता तुतारे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संदीप काटे, सोसायटी मधील अनेक ज्येष्ठ नागरिक व सभासद उपस्थित होते.




