मुंबई : भारताने आशिया कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे अवघा देश डोळे लावून बसला होता. हो नाही करता करता भारतानं मॅच जिंकली. हार्दिक पंड्याच्या सिक्सने सगळा गेम पलटला. ही मॅच जिंकल्यानंतर सगळीकडे हार्दिक आणि त्याच्या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली.
Thank you Indian Cricket Team for making it a Happy Sunday for India! 🏏 pic.twitter.com/pDWWWKcd6n
— Supriya Sule (@supriya_sule) August 28, 2022
पण याचवेळी सोशल मीडियावर एक व्हीडओने धुमाकूळ घातला. हा व्हीडिओ आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा. मॅच जिंकता क्षणी शरद पवार यांनी आपला हात उंचावत व्हिक्ट्रीची साईन दाखवली. मॅच संपता क्षणी अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ ठेवला होता. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरही हा व्हीडिओ पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हीडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. अवघ्या 11 सेकंदाचा व्हीडिओ अनेकांची मनं जिंकतोय.



