चिखली : सोलर सिटी घरकुलमध्ये बाप्पा मोरया रे गाण्याचे शुटिंग करण्यात आले. गेली २ वर्ष कोरोनामुळे सार्वजनिक उत्सव साजरा करता आले नाहीत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव करिता घरकुलमध्ये गणेशोत्सवाची तयारी होत असताना बाप्पा मोरया रे गणपतीच्या गाण्याचे व्हिडिओ शूटिंगच्यामुळे घरकुल मध्ये यंदाचा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

अजितसिंह पाटील Film’s & Entertainment व विश्वाजित प्रोडक्शन निर्मित ” बाप्पा मोरया रे , या गाण्याचं नुकतेच Recording मुंबई येथे पार पडले. ‘बाप्पाबाप्पा मोरया रे , हे गाणं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व सुप्रसिद्ध गायिका सोनाली सोनवणे यांच्या मधूर आवाजात Recording झाले आहे. या गाण्याचे व्हिडिओ शूटिंग घरकुल मध्ये घेण्यात आले.

या गाण्याचे लेखक संभाजी बारबोले असुन म्युझिक संभाजी बारबोले व आकाश साठे यांनी दिले आहे.या गाण्यामध्ये weaa मिस् इंडिया विनर Dr. प्रचिती पुंडे व यांचा ग्रुप सहभागी झाला होता . या गाण्यामध्ये पारंपरिक मल्हार ढोल ताशा पथक घरकुल या पथकाने सुंदर नियोजन व सुरेख वादन performance केला आणि गाण्याला एक चांगला लुक दिला. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग घरकुल ला घेण्यासाठी घरकुल मधील सत्य प्रेम काशीद मल्हार ढोल ताशा पथक व अशोक मगर यांनी मेहनत घेतली. घरकुल मधील नागरिकांना गेल्या आठ वर्षांमध्ये हा एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला. या व्हीडीओ चे शूटिंग वेळी घरकुल मधील नागरिकांनी सहभाग घेऊन शुटिंग चा आनंद घेतला. गणेश उत्सवाच्या अगोदर घरकुल मधील लहान मुलांन पासुन वयोवृद्ध नागरिकांनी गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला. या व्हिडियो मुळे घरकुल देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे. या गाण्याचा विडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




