पुणे पिंपरी चिंचवड सह राज्यातील अनेक घराघरात आपल्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. तर पिंपरी चिंचवड सह पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापना केली आहे. पुण्यातील धनकवडी भागात असणाऱ्या ९ गणेश मंडळांनी गणेश चतुर्थी निमित्त आज लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकाच ट्रॅक्टर ट्रॉली वर तब्बल ८ मंडळांनी त्यांच्या गणपतीच्या मूर्ती बसवत वाजत गाजत मिरवणूक काढली.
केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाइव स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आखिल मोहन नगर मित्र मंडळ या सगळ्यांचा समावेश समाजासाठी आपण काही देणं लागतो एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंडळांकडून सांगण्यात आले. तसेच गणेशोत्सवात होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते हे देखील लक्षात घेता या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती सोबतचा फोटो शेअर केला असून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाची पूजा करत असतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणपतीच्या शुभेच्छा दिल्या…
राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा! pic.twitter.com/3HkYthhNJI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 31, 2022

वर्षा निवासस्थानी आज श्री गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी श्री गणेशाचे सहकुटुंब पूजन केले.
अजित पवार यांच्याकडून गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा….
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1564801760710995968?t=VmcN6d_ZdwWA08PsGYZE4g&s=19
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेची वाटचाल श्रीगणरायांच्या कृपाशिर्वादानं अधिक गतिमान होवो असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंदाच्या, उत्साहाच्या, भक्तीमय वातावरणात, शिस्त व नियमांचं पालन करुन साजरा करुया असं अवाहनही अजित पवारांनी केलं आहे.
——
मुंबईतील लालबागचा राजा गणपतीची प्रतिष्ठापना पूर्ण झाली असून लालबाग येथे असलेल्या राजा राम मंदिरात बाप्पा विराजमान झाले आहेत. यानंतर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. बाप्पांची आरती सध्या सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
कोकणात चाकरमान्यांची आपल्या लाडक्या बापाला घरी विराजमान करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गणपतींचे आगमन झाले असून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील मुंबईत असलेले सर्वजण आपापल्या गावी गोळा झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावोगावचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
कोल्हापुरात शाहुराजे छत्रपतींच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात ढोलताशांच्या गजरात गणपतींचे स्वागत केले जात आहे.




