पिंपरी : देहूरोड ते चांदणी चौक दरम्यानच्या विविध रस्त्यांवर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गुरुवारपासून (१ सप्टेंबर) याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. अशी माहिती पिंपरी पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
चौकातून राष्ट्रीय महामार्ग ४ वरील चांदणी चौक, कोथरूड, कात्रज तसेच सातारा भूगाव रस्त्यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी असेल. तसेच, भूगाव मुळशी रस्त्याकडून आणि देहू रोड-किवळे येथून चांदणी चौक, कोथरूड, सातारा रस्त्यावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. एनडीए रस्त्याकडून चांदणी चौकमार्गे सातारा बाजूकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी असणार आहे, असे भोईटे यांनी सांगितले.




