रहाटणी येथे मा. नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते तसेच युवानेते शुभम नखाते यांच्या संकल्पनेतून गणेश मुर्ती विसर्जन करिता कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी सदस्य प्रकाशराव मिटभाकरे व मा. नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

मिटभाकरे ह्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करिता अशा प्रकारे तलाव करण्याची नखाते यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. पर्यावरण संरक्षण करणारे उपक्रम राबवायला लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतल्याने नखाते यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रभागातील नागरिक बंधूभगिनी व युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती. चंद्रकांत आण्णा नखाते यांच्या संकल्पनेला शुभेच्छा दिल्या.




