मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. राज्यपालाकडे मागील दोन वर्षापर्यंत वर्षापासून ही यादी पडून होती याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांकडून हा तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या कार्य तत्परतेबाबत महाराष्ट्रातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. दोन वर्षापासून पाठपुरावा करूनही ठाकरे सरकारच्या यादीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, भाजपसोबत सत्तेत आलेले एकनाथ शिंदे यांनी मागणी करतात एकाच दिवसात ही यादी रद्द करण्याची किमया केली.



