वाकड ; गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… घोषणांनी वाकड परिसरात अनेक घरगुती व गणेश मंडळांनी गणेशाला निरोप दिला. सामाजिक कार्यकर्ते विक्रम वाघमारे यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन करिता कृत्रिम तलाव तयार केला. यात जवळपास ३००० नागरिकांनी गणेश विसर्जन व मुर्तीदान केले. वाघमारे यांच्या संकल्पनेचे परिसरात नागरिकांनी कौतुक केले. पर्यावरण संरक्षण करणारे उपक्रम राबवायला लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतल्याने वाघमारे यांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम वाघमारे यांच्या संकल्पनेतून विक्रमभाऊ वाघमारे युवा मंचाने हा गणेश विसर्जन करीता कृत्रिम हौद बनविण्यात आला होता. परिसरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. वाकड येथील पर्यावरण पुरक विसर्जन हौदमधे २७०० ते २८०० श्री गणेश मुर्त्यांचे संकलन करण्यात आले.

वाकड परिसरातील श्री गणेश भक्तांनी यावेळी विक्रमभाऊ वाघमारे युवा मंचच्या स्थुत्य उपक्रमाचे कौतुक केले व नदी घाटावर विसर्जन न करता विसर्जन हौद उपलब्ध करुन दिलेल्या पर्यावरण हौदमध्ये श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी युवा मंचचे कार्यकर्त्यांनी मूर्तीचे संकलन केले तसेच निर्माल्य गोळा करून पालिका कचरा निर्मूलन समितीकडे जमा केले. वाकड येथील नागरिक, महिला व लहान मुलांसह अबाल वृद्ध गणेश विसर्जन करण्यात उत्साहाने सहभागी झाले होते.




