नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ आज दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपलं मत मांडलं आहे.
“सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणं चुकीचं आहे. मी त्याबाबत माझं मत मांडलं. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणं हे चुकीचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. याबाबत राज्यपालांना भेटणार का? असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.



