औरंगाबाद : शिक्षकांना मुक्त वातावरणात शिकवू द्या, मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करा, अशी मागणी करत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. रविवारी (ता.११) दुपारी भरपावसात औरंगाबादेत हजारो जि.प. शिक्षकांसह शिक्षक आमदार, पदवीधर आमदार एकवटले होते.
नवीन शैक्षणिक धोरण गरिबांच्या मुलांच्या मुळावर उठले आहे. गरिबांची मुलं जिल्हा परिषदांच्या शाळात शिकतात. शिक्षकांना बदनाम करून या शाळा बंद करण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे. आमदार बंब हे प्यादे आहेत, त्यांचा बोलवता धनी दुसराच आहे. महाराष्ट्रात नथुरामी वृत्ती यशस्वी होणार नाही, याची काळजी घ्यावी.



