पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ५२११ घरांची सोडत म्हाडा काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतील २७८ सदनिका प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका व २० % सर्वसमावेशक गृहनिर्माण योजन अंतर्गत २०८८ सदनिका एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), आणि चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव आणि अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या गुरूवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता पुणे जिल्हा परिषद, पुणे कार्यक्रम पार पडला.
पुणे मंडळामार्फत मागील २ ते ३ वर्षांपासून पुणे मंडळाने सोडतीनंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी पात्रता शिबीराची अभिनव कल्पना अंमलात आणलेली आहे. यामध्ये आपण सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना ई-मेलद्वारे सूचनापत्र व त्यासोबत पात्रतेसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची यादी व विहीत नमुने पाठवीत आहोत. अशा अर्जदारांसाठी पुणे मंडळाते ४ दिवसांचे पात्रता शिबीर आयोजित करण्यात येते. वरील यशस्वी अर्जदार सदर पात्रता शिबीराच्या कालावधीत वरील नमूद विहीत नमुन्यातील कागदपत्रे घेऊन सदर शिबीरात उपस्थित राहतात व सदर शिबीरात आपले कर्मचारी त्वरीत कागदपत्रांची पडताळणी करुन जर अर्जदार पात्र ठरत असल्यास अशा अर्जदारास त्याच दिवशी तात्पुरते देकार पत्र देण्याची कार्यवाही केली जाते. त्रुटी असलेल्या अर्जदारांना ठराविक कालावधीत त्रुटीची कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली जाते.

वरील अभिनव कल्पनेमुळे अर्जदारांना शारीरिक व मानसिक त्रासातून दिलासा मिळतो. त्यामुळे म्हाडा व विकासक यांनाही त्यांची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी मदत होते. या शिबीराविषयी अर्जदार व विकसक यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांचे या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करत आहेत.
करिता जुलै २०२२ च्या सदनिका सोडतीचे पात्रता शिबीर दिनांक १२, १३, १४ व १५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी श्री. नितीन माने पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे यांनी दिली.
अ) शिबीरासाठी उपलब्ध झालेल्या सदनिकांचा तपशिल खालीलप्रमाणे. २०% सर्व समावेशक गृहनिर्माण योजना
पुणे महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२०% सर्व समावेशक गृहनिर्माण योजना (एकूण)
५७५ सदनिका
१५१३ सदनिका
एकुण : २०८८ सदनिका




