पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालय पिंपरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशन यांच्यावतीने राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय खाबडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापूसाहेब गायकवाड, विलास देसले, दादा भागवानी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, असोसिएशनचे संतोष कुदळे, चंद्रकांत कुंभार, प्रविण धुमाळ, धनाजी नखाते, यांच्यासह उपअभियांता , कनिष्ठ अभियांता उपस्थित होते.




