देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असेल. टाटा टियागो इव्ही 26kWh किंवा 30.2kWh बॅटरी पॅकसह येण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकते.
CITROEN C3 EV: Citroen भारत आणि ब्राझीलमधील बाजारपेठ पाहता एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार तयार करत आहे. कंपनी C3 हॅचबॅकवर आधारित सर्व-नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या गाडीचं डिसेंबर 2022 पर्यंत अनावरण केले जाऊ शकते आणि यानंतर 2023 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केले जाऊ शकते. नवीन मॉडेल सीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे अनेक बॉडी स्टाइल आणि पॉवरट्रेनसह येईल. ही 300 किमीची रेंज देणारी कार देखील असू शकते.
MG SMALL EV: एमजी मोटर इंडियाने आपल्या नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारची चाचणी सुरू केली आहे. 2023 च्या पहिल्या सहामाहीत लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे Wuling Air EV वर आधारित असेल. या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये डेब्यू झाला होता. भारतीय बाजारात त्याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असू शकते.




