महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा व्दारा संचालित एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन समारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्र. द. पुराणिक आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा सन्मान प्रा. सचिन दुर्गाडे यांना देवून गौरविण्यात आले. शाळेची माजी विद्यार्थीनी सुश्री उषा लोहाडीया, संस्था विद्या संकुल समन्वयक माजी प्राचार्या सुश्री लक्ष्मी गिडवाणी, जेष्ठ चित्रपट लेखक आबा गायकवाड, जेष्ठ कला शिक्षक पोपट भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
प्र. द. पुराणिक यांना माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुराणिक सरांनी विद्यालयात शिस्त, आतंरभारती उपक्रम, शाळेतील प्रत्येक वर्गात प्रांत योजना, स्वावलंबी सफाई योजना, मूल्यशिक्षणावर आधारित स्वच्छता, सदाचार आणि उपक्रमशिल शिक्षणाची पायाभरणी करण्यात मोठे योगदान दिले आहे.
माजी प्राचार्य प्र. द. पुराणिक आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 प्रा सचिन दुर्गाडे यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सांगितले की शिक्षणाच्या प्रवाहात शिक्षक हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पुराणिक सरांच्या नावाने मिळणारा सन्मान हा शिक्षण क्षेत्रातील कार्यास प्रेरणा देणारा सन्मान आहे. शिक्षणासाठी, विद्यार्थी वर्गासाठी सतत सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणादायी आहे… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती ठाकूर तर आभार साक्षी योगी यांनी मानले.



