पुणे : पुणे शहरात लावलेले अनधिकृत फ्लेक्स बोर्ड वाढदिवसाचे बॅनर्स व इतर छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या फ्लेक्स वरती महापालिकेकडून मध्यरात्री कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होणार नाही. पालिका कर्मचाऱ्यांना काम करताना कोणताही ताण येणार नाही या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून रात्री दहा ते दोन या काळात ही कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी व भावी नगरसेवकांनी वाढदिवसाच्या अथवा इतर प्रसिद्धी करण्यासाठी लावलेल्या होर्डिंग्स रातोरात गायब होत आहेत. शहरातील अनेक प्रमुख चौक व पतदिवयांचे खांब यावरती अनधिकृत फ्लेक्स लावले जातात यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा महापालिकेचे पथक कारवाईसाठी जातात. मात्र राजकीय दबाव टाकत असल्यामुळे दिवसा ही कारवाई करण्यास महापालिकेचे पथक टाळाटाळ करते त्यामुळे आता रात्रीच्या वेळी कारवाई झाल्यास शहर स्वच्छ होणार आहे.



