नवी दिल्ली केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता राहुल गांधी यांच्या यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप काँग्रेस कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी येडी चा समान च्या आधारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे.
बुधवारी गोव्यात भाजपने ऑपरेशन लोटस केले काँग्रेसचे दहापैकी आठ आमदार भाजप पक्षात सामावून घेतले. त्यामुळे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतातील मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तो यशस्वी होणार नाही. सुडाचे राजकारण झाले तर आमचा निर्धार आणखीनच बळकट होईल असे प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटर व दिले आहे.



