नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी काँग्रेस दुबळी करू शकतो या आरोपाचा इन्कार केला आहे. तसेच त्यांना भाजपची बी टीम असल्याचा दावा ही खोडून काढला आहे. हे दोन्ही आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी यावेळी मुलाखती दरम्यान म्हटले आहे.
यावेळी केजरीवाल म्हणाले की देशातील सगळी जनता सोबत आले तर आपण मागे राहणार नाही. त्यामुळे आम्ही “मेक इंडिया नंबर वन” सुरू केले आहे. देशात दररोज आमदारांच्या खरेदी-विक्रीच्या बातम्या आपण वाचतो. इतके आमदार खरेदी केले, इतके पैसे लागले अशी चर्चा होते. मात्र हे पैसे येतात कुठून असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
गरिबांची मुले शिकली तर देशातील गरीब दूर होईल. चांगल्या कामांचा प्रचार करणे गरजेचे आहे. आम्ही चांगले काम केले तर त्याचा प्रचार करतो. 130 कोटी जनता एकत्र आली तर देशातील सगळ्याच नेत्यांना काम करावे लागेल. सगळ्यांनी काम केले तरच देश पुढे जाईल. आपल्याला देश आणि समाजाचे स्वप्न पहावी लागतील. भाषणबाजी करून देश पुढे जाणार नाही. उद्योगपतीची कोट्यावधीची कर्ज माफ केली जातात असेल तर देश कसा पुढे जाईल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.



