हरियाणा शिक्षण विभाग सरकारी शाळांमधील 9 आणि 11 वी च्या वर्गात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सायकली वाटणार आहे. सायकल योजनेचा लाभ फक्त अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे, ज्या विद्यार्थांची शाळा त्यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त आहे. गुरुग्राममधील सिव्हिल लाइन्स भागात असलेल्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात 20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय सायकल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील चारही गटातील एससी प्रवर्गातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायकल खरेदीसाठी 3100 आणि 3300 रुपये किमत विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या योजनेनुसार, अनुसूचित जातीच्या इयत्ता 9 आणि 11 वीच्या अशा विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहे, ज्यांच्या गावात 9 आणि 11 वीची शाळा नाहीत. हे विद्यार्थी त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर पुढील अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावाती शाळेत जातात. जिल्हास्तरीय मेळाव्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची सायकल निवडता येणार आहे.



