खडकवासला – रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सिंहगड घाटात दरड पडली. गडावरील पहिल्या दिड किलो मीटरच्या अंतरावर जगताप मातीचा पुढचे वळण असलेल्या परिसरात दरड पडली आहे. यामुळे घाट रस्ता बंद झाला आहे. सकाळची वेळ असल्याने वाहतूक तुरळक होती. त्यामुळे सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.
रात्रभर गडावर पावसाची संततधार होती. या दरडीचा भाग ठिसूळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात दरड पडण्याची शक्यता असते. सकाळची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. असे येथील सामाजिक कार्यकर्ता माऊली कोडीतकर यांनी ‘प्रभात’ शी बोलताना सांगितले. दरड पडल्याचे कळताच वरिष्ठांना माहिती देऊन गडावर जाणारा रस्ता गोळेवाडी व कोंढणपूर येथे बंद केले आहेत. असे वनरक्षक बाळासाहेब जीवडे यांनी सांगितले.



