पिंपरी (प्रतिनिधी) महिला एकटी घरी असताना घरात घुसून तुझ्या मुलाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत घरात तोडफोड केली.
ही घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे पडली. अनिल सुभाष होतकर (वय २३) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुशांत सुतार (वय २४), सागर जांभुळकर (वय २२, दोघे रा. जांभूळगाव) व यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




