किवळे (वार्ताहर)- तरुणाचे अपहरण करून गंभीर जखमी करणाऱ्या टोळक्यातील पाच जणांना अटक करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी २० सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास चिंचोली गावात घडली.
सोमवारी (दि. १९) आशिष याने आत आत्महत्या केल्याचा मनात राग धरून मंगळवारी २० सप्टेंबरला मयत देवरमणीचे नातेवाईक या प्रकरणातील आरोपी रिक्षा मधून फिर्यादीच्या राहत्या घरी आले. आरोपी राजू देवरांनी याने फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व त्यानंतर तोही स्वतः रिक्षात बसला. त्यानंतर अक्षय देवरमणी, शिवराज देब्रम्हणी दिपक सौदे व कुणाल कटारे हेही त्या रिक्षात बसले. तुझ्यामुळे आमचा आशिष गेला तुला जीवंत सोडत नाही तुझा मर्डरच करतो असे म्हणत फिर्यादीला हाताने व लाथा बुक्याने मारहाण केली.
कुणाल कटारे याने सुरा काढून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर फिर्यादीला सेंट्रल चौक देहूरोड येथे दिशातून रस्त्यावर ढकलून देऊन सोडून निघून गेले.
याबाबत महेश यमगड्डी (वय २२ वर्षे, रा. भैरवनाथ मंदिरामागे चिंचोली) यांनी फिर्याद दिली आहे. राजू देवरमणी, वय ४९ वर्षे, अक्षय देवरमणी, वय २४ वर्षे, शिवराज देवरमणी, वय ५८ वर्ष, वैभव नाईक, वय ३० वर्षे, दीपक सौदे (वय ३७, सर्व रा. गांधीनगर, देहूरोड) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल कटारे हे या प्रकरणात सहावा आरोपी आहे. या सर्व आरोपींच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




