लोणावळा (वार्ताहर) भागातील या शाळेच्या बाहेर पोलिसांनी फिक्स पॉईट लावत पोलीस पेट्रोलिंग सुरु केली आहे.. सोबतच कुमार चौक, मावळा पुतळा चौक व बाजार भागात विना परवाना दुचाकी घेऊन शाळेत येणारे विद्यार्थी व ट्रिपल सिट दुचाकी चालविणारे विद्यार्थी यांच्यावर दंडात्मक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. ज्या शाळेच्या मुलांनी भांडणं केली त्या शाळेने देखील शुक्रवारी पालक बैठकीचे आयोजन केले आहे.
लोणावळ्यात शाळकरी मुलांनी सार्वजनिक रस्त्यावर भांडण केल्याचा एक व्हिडिओ मागील मिडियावर व्हायरल झाला. त्याचे अनेक पडसाद उमटले. धिंगाणा घालणाऱ्या मुलांवर चाप बसविण्यासाठी शाळेच्या बाहेर पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु करावी, अशी मागणी मनसे, भाजपा व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने केली होती. त्यानुसार गवळीवाडा
शाळा भरताना, सुटताना तसेच मधल्या सुट्टीच्या वेळेस दोन पोलीस याठिकाणी तैनात असणार आहे. तसेच शाळेच्या बाहेर सार्वजनिक धिंगाणा घालणारी शाळाबाह्य मुले यांच्यावर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस नेमण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले.




