चांदखेड: गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर नवरात्र महोत्सवाला यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा खेळला जातो. मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे राज्यात दांडीया आणि गरब्याला बंदी होती. पण यावर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्र साजरी केली जात आहे त्याचबरोबर विशेषता महिला वर्गातून नऊ रंगाच्या साड्या घालून हा उत्सव साजरा केला जातो.
नवरात्रोत्सवात नऊ दिवसाला नव – नवीन साड्या घातल्या जातात. ऑफिस, काम, स्कूल, कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला, मुली हे नवरात्रीचे नऊ रंग अगदी आर्वजून पाळतात. असाच पिवळ्या रंगाच्या साड्या नेसलेला पेहराव आज मावळ तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत लपलेल्या चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षकांनी केलेला दिसून आला.
पिवळ्या रंगाचे महत्त्व….
प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो उदारणार्थ – फुल, हळद, देवाची वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी हि पिवळीच नेसवतात आणि सूर्यकिरणांशी संबधीत असा हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो.
मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये विश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो.




