पिंपरी (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची शहर भाजपच्या नेत्यांनी मुंबई मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल फडणवीस यांचा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.
माजी महापौर उषा ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेविका संगीता भोंडवे, शारदा सोनावणे, मनीषा पवार, माधवी राजापुरे, आरती चोंधे, उषा मुंढे, निर्मला कुटे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सागर अंघोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, नरेश आप्पा खुळे, कैलास कुटे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे उपस्थित होते.
महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची २०१७ मध्ये सत्ता आल्यानंतर विविध विकास कामे केली आहेत. विकासाला गती देणारे आणि चालना देणारे मोठमोठे प्रकल्प विकसित करण्यात आले. यापैकी लोकउपयोगी ५ महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे यासाठी निवेदन दिले.




