पिंपरी :- व्यसनी तरुणाला कुटुंबियांनी चार दिवसांपूर्वी चिखलीतील पाटीलनगर येथील मनोविकास व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान केंद्रात दाखल रुग्णांना मार्गदर्शन करून चर्चा करण्यात येत होती. त्यात मनोरुग्ण तरुणही सहभागी झाला होता. त्यावेळी तो उठून केंद्रातील वरच्या खोलीकडे गेला. त्यानंतर जिन्यात कपड्यांच्या साह्याने त्याने गळफास घेतला.
तरुणाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले, परंतु. डाॅक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. शुक्रवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. सेामनाथ यशवंत सुतार (वय २४, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातवाईकांच्या ताब्यात दिला. व्यसनांमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.




