पुणे : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर तेथील रस्त्याच्याकडेचे खडक फोडण्यासाठी मंगळवारी (४ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा ते दीड असा दोन तासांचा ब्लॉक घेत पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबई ते सातारा या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी हा ब्लॉक असणार आहे. खडक फोडण्यासाठी १६ ठिकाणी होल घेत स्फोट करण्यात येणार आहे. हे स्फोट होताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच एका बाजूची लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई – सातारा या लेनवरील वाहतूक रात्री दीड पर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळविण्यात आली होती.




