पिंपरी : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांचे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शहरातील विविध प्रश्नासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी महापालिकेत अचानक एंट्री केल्याने पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
दसऱ्या दिवशी थेरगाव येथील कार्यक्रमात सोसायटीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्याच्या प्रश्नासाठी आणि शहरातील इतर समस्यांसाठी आणि महापालिकेतील इतर कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार थेट महापालिकेत दाखल झाले आहेत.




