गुजरात : गुजरात मध्ये भारतीय जनता पक्ष पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेकला आहे. आपला पक्ष हरणार असल्याचे दिसत असल्यानेच त्यांनी आता तेथे पुन्हा हिंदू कार्ड बाहेर काढले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी केला आहे. गौतम यांनी एका वादानंतर अलीकडेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम यांनी हा दावा केला आहे.
गौतम यांनी एका बुद्ध दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला होता. तथापि, आपण मंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून या कार्यक्रमात गेलो होतो. या कार्यक्रमात उपस्थितांना २२ प्रतिज्ञा दिल्या गेल्या. याच प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनीही बौद्ध धर्माची दीक्षा घेताना घेतल्या होत्या, असा दावाही गौतम यांनी केला आहे.. या प्रकरणातून वादंग माजल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गौतम यांना चौकशीसाठीही पाचारण केले होते.
या चौकशीवेळी वरील असेही गौतम यांनी सांगितले. बाबी त्यांनी कथन केल्या आहेत, पोलिसांनी आपली साडेतीन तास चौकशी केली. भाजपचे अन्य नेते प्रक्षोभक वक्तव्ये करतात त्यांच्यावर मात्र काही कारवाई होताना दिसत नाही. त्यातून भाजपचे नेमके चारित्र्य उघड होते, असेही त्यांनी म्हटले आहे.. भाजपला गुजरात निवडणुकीसाठी पुन्हा हिंदू कार्ड खेळायचे आहे. त्यांचा गुजरातेत पराभव होणार आहे ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा हा आटापिटा सुरू केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.




