रोहा : रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे भाजपमध्ये आज (ता. १४) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी १० वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित माजी आमदार तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजपत प्रवेश करणार आहेत.
आमदार अवधूत तटकरे, हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ आहेत. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. यामुळे एकेकाळी सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते. त्यांची आक्रमकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली.
अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणेही आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.



