मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार सज्ज झाले आहेत. नाट्यमय घडामोडीनंतर लटकेंविरुद्ध पटेल असा सामना रंगणार आहे.
ऋतुजा लटकेंचा राजीमाना न स्वीकारण्यासाठी पालिकेच्या आधिकाऱ्यावर दबाव आसल्याचे सांगितले जात होता. मात्र आज ठाकरे गटा कडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अंधेरीत रंगणार अटीतटीचा सामना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऋतूजा लटके दाखल
ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहिले आहेत. लटके निवडणूक कार्यालयात दाखल झाल्या असून काही वेळातच त्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील.
भाजपचे मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शक्ति प्रदर्शन झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आशिष शेलार सहभागी झाले होते. अंधेरीत अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे



