गंगटोक : देशात अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा फटका सिक्कीमला बसला आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ५५० पर्यटक अडकले आहेत. पर्यटक अडकल्याची स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
सिक्कीममध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे राजधानी गंगटोक आणि त्याच्या लगतच्या भागातील पाणीपुरवठ्यावर खंडीत झाला आहे. तसेच उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याने पर्यटक अडकले आहेत. त्यामुळे जवळपास ५५० पर्यटक अडकले.
या पर्यटकांची माहिती मिळताच घटनास्थळी स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून मदत केली जात आहे. पर्यटकांना जेवन, पाणी पुरवण्यात येत असून, ज्या पर्यटकांची प्रकृती ठीक नाही अशा पर्यटकांपर्यंत औषधे पोहोचवण्यात आल्याची ५५० पर्यटक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीममधील हवामान अद्यापही खराबच आहे. अडकलेल्या पर्यटकांना सातत्याने सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हिमालयीन राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.




