मुंबई : रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ही निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक लढवताना आजपासून (शनिवार) त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचाराला सुरुवात होताच ऋतुजा लटके यांनी लोक मला बहुमताने निवडून देतील. ३ तारखेला सर्वकाही स्पष्ट होईल, असं विधान त्यांनी केलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
यावेळी ऋतुजा लटके म्हणाल्या, “रमेश लटके ज्याप्रमाणे गणपती मंदिराचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करायचे. तशीच सुरुवात आम्ही केली आहे. माझ्या प्रचार सभेला सगळे आपले जुने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आजपासून हा प्रचार सुरू होतोय. काल अर्ज दाखल करताना लोकांनी मोठी गर्दी होती. रमेश लटके यांच्याबाबत लोकांचं असलेलं प्रेम आणि निष्ठा माझ्यासोबतही कायम असल्याचं यातून दिसलं.


