पिंपरी : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधारांना हयात प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत १५ नोव्हेंबर आहे. तोपर्यंत हे प्रमाणपत्र दाखल न केल्यास त्यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. मार्चपर्यंत लाभार्थी संख्या ४६ ९ ३ होती त्यामधील ३५७५ लाभार्थ्यांनी हयात दाखले सादर केले आहेत.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधराव्यामध्ये मंडलनिहाय घेतल्याने संजय गांधी योजनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले देण्यात आले . शिल्लक १११८ लाभार्थ्यांमधील जे लाभार्थी हयात आहेत. तसेच ज्यांना सज्ञान मुले नाहीत आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी त्यांचे उत्पन्न दाखले व हयात दाखले रेशन कार्ड सादर केल्यास उत्पन्न दाखला कार्यालयात सादर केल्यानंतर सदर लाभार्थ्यांचा लाभ सुरु करण्यात येईल.
जयश्री मांडवे , नायब तहसीलदार , संजय निराधार योजना , मावळ
कोठे मिळेल हयातीचा दाखला ?
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने घरबसल्या निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे . यामुळे बँकेत होणारी गर्दी टाळता येईल . यासाठी ज्येष्ठ नागरिकांना https://locator.csccloud.in/ किंवा http://ccc.cept.gov.in/covid/request.as px या संकेतस्थळावर जावं लागणार आहे . या व्यतिरिक्त जवळच्या पोस्टामध्ये जाऊनही तुम्हाला हयातीचा दाखला सादर करता येईल .




