पिंपरी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीची भोसरी विधानसभा मतदार संघात शनिवार (दि. १५) रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, महिला निरीक्षक शितल हगवणे, महिला शहराध्यक्षा प्रा , कविता आल्हाट, माजी महापौर मंगला कदम, पुणे जिल्हा निरीक्षक लोचन शिवले, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला समन्वयक सुप्रिया सोळणपुरे, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, दत्तात्रय जगताप, काशिनाथ जगताप, युवराज पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन भोसरी विधानसभा अध्यक्षा ज्योती तापकीर व कार्याध्यक्ष ज्योती गोफणे यांनी केले होते. या बैठकीत महिलांना संघटनेत काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रभागात येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर काम कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. पक्ष बांधणी, सभासद नोंदणी हे घरोघरी जाऊन करण्यात यावे, महिलांनी राजकारणात समतोल कसा राखावा प्रामाणिक काम करून कसे पुढे जावे याचे मार्गदर्शन माजी महापौर कदम, विभागीय अध्यक्ष नागवडे, शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी केले. यावेळी काही महिलांना विविध पदावर नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.




