नवी दिल्ली. : भारतीय जनता पार्टीचे असंतुष्ट नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे आपल्याच पक्षाला लक्ष्य करत असतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारत सरकारच्या युक्रेन प्रकरणातील भूमिकेवरून काही दिवसांपूर्वी त्यांनी निशाणा साधला होता. आता स्वामी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे..
मध्य प्रदेश सरकारने एमबीबीएसचे शिक्षण हिंदी भाषेतून देण्याचा निर्णय घेतला आहे व वैद्यकीय शास्त्राची हिंदीतील पुस्तकेही त्यासाठी बाजारात आणली आहे. मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मातृभाषेतून शिक्षणाबद्दल सुतोवाच केले होते.
मध्य प्रदेशने त्या दिशेने सगळ्यांत अगोदर पाऊल उचलले आहे असे नमूद करत शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर प्रशंसा केली होती. त्यावर स्वामी यांनी खोचक टीप्पणी केली आहे.
एमबीबीएस हिंदीतून शिकवता येण्याच्या कामात आता गृहमंत्री शहा गुंतले आहेत असे खोचक ट्वीट स्वामी यांनी केले आहे.
प्रथम
एमबीबीएसच्या वर्षाच्या तीन हिंदीतील पुस्तकांचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी चौहान यांची प्रशंसा त्यांनी केली होती व उपस्थित विद्यार्थ्यांवर समोर बोलताना ते म्हणाले होते की इंजिनिअरींग आणि वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेले जे मातृभाषेचे समर्थक आहेत त्यांना आता त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार असल्यामुळे आजचा हा दिवस महत्वपूर्ण आहे.
जो आपल्या भाषेत विचार करतो त्याला त्याच भाषेत शिक्षण मिळाले तर चांगले काम तो करू शकतो असे नेल्सन मंडेला यांच्या विधानाचा हवाला देत शहा यांनी नमूद केले होते.




