पिंपरी :- ऑक्टोबर महिना हा विविध सणांनी भरलेला महिना आहे. नुकताच नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा सण पार पडला. आता लोकांना दिवाळीचे वेेध लागले आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराची साफसफाई, आकाश कंदील पणती खरेदी, फराळ खरेदी, कपडे खरेदी, सोने चांदी दागिन्यांची खरेदी असा विविध वस्तूंची खरेदी, सुट्ट्यांचं प्लॅनिंगची तयारीला वेग आला आहेे. दिवाळीसाठी बाजारपेठ सुद्धा तयार झाला आहेे. दिवाळी साठी लागणारी मिठाई, फटाके दुकानेे ठिकठिकाणी सुजले आहेत.

दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दीपोत्सव हा भारतात सगळीकडे साजरा केला जातो. अर्थात दीपोत्सव म्हणजेच, या दिवशी घरात पुढचे पाच दिवस दिवे लावले जातात, घरात सुशोभित रांगोळी काढली जाते. आकाशकंदील लावला जातो. फराळांची लगबग सुरु असते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या दरम्यान हा सण येतो.
बाजारपेठा, घराची रोषणाईने सजल्या
दिवाळीचा सण जसजसा जवळ येतोय तशीच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण देखील वाढत आहे. बाजारात देखील विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात दिसत आहेत. अनेक ज्वेलर्सच्या दुकानांनी व बिल्डर्सनी दिवाळीनिमित्त आकर्षक योजना आणून नागरिकांना खरेदीची वेगवेगळ्या ऑफर दिले आहेत. कोविडनंतर मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदाची दिवाळी आनंदाची व उत्साहाची जाणार आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढत चालला आहे.




