पुणे – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. सोमवारी लक्ष्मीपूजन असून उद्या रविवार सुट्टी आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. बसस्थानक, रेल्वस्थानक आणि खासगी बस थांब्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे. त्यातच पुणे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना चेंगराचेगरी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रवासी पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढत असताना ही दुर्घटना घडली. बौद्ध मांझी (२१) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे. पुणे दानापुर एक्स्प्रेस गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असताना हा प्रकार घडला. दानापूर एक्स्प्रेस गाडी बिहार राज्यात जाते. दिवाळीमुळे गाडीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी रेल्वेत बसताना चेंगराचेंगरीत दुर्घटना घडली.



