पिंपरी (प्रतिनिधी ) नोव्हेंबर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकारचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पुणे विभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ कार्यक्रम पार पडला. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री, भारत सरकार भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथून ऑनलाइन पायाभरणी करण्यात आले. या वेळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड कॅम्पस पिंपरी नेहरूनगर रोड येथे भौतिक भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी अपर केंद्रीय भविष्य निधि आयुक्त पुणे झोन एमएसके व्हीव्ही सत्यनारायण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अमित वशिष्ठ, रवींद्र कुमार, मनोज माने, आदित्य तलवारे, ईपीएफ कर्मचारी युनियनचे सचिव दिनेश शेलार आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश लांडगे यांनी पीएफ, पेन्शन आणि विमा यांसारख्या सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये ईपीएफओने दिलेल्या सेवांबाबत समाधान व्यक्त केले. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना जवळच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाच्या फायद्यासाठी सेवा सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.
ईपीएफओ ने कार्यालय इमारत आणि कर्मचारी वसाहत बांधण्यासाठी हिंदुस्तान एंटिबयोटिक्स लिमिटेडकडून साडे तीन एकर जमीन घेतली. केंद्रीय विश्वस्त मंडळ ईपीएफओचे सदस्य प्रभाकर बानासुरे यांनीही याप्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.




