वडगाव मावळ : ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरील वडगाव फाटा या ठिकाणी ही घटना घडली आहे.
प्रणय प्रदिप पारकर (वय २१, रा.सांताकु्रज ईस्ट मुंबई) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रथमेश विजय खाडे (वय २५) व प्रणय प्रदीप पारकर हे दोघे त्यांच्या ताब्यातील (क्र. एम.एच. ०२ इ.व्ही.४१०८) दुचाकीवरुन मुंबई कडून पुण्याकडे जात असताना जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वडगाव फाटा येथे ट्रकने (एम.एच.१४,जी.यु.१८६६) त्यांच्या दुचकीस जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवर पाठीमागे बसलेला प्रणय प्रदिप पारकर (वय २१, रा.सांताकु्रज ईस्ट मुंबई) याच्या पोटावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रथमेश खाडे याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस हवालदार अजित ननावरे हे या गुन्ह्यातील पुढील तपास करत आहेत.



