पपई खाल्ल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होतात. पपई बिघडलेली मासिक पाळीची सायकल पून्हा रूळावर आणते. हे तर सर्वज्ञात आहे. त्याप्रमाणे डेंग्यू झाल्यावर पपईची पाने खाने आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. पपईच्या फळामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पण, डेंग्यू झाल्यावर पपईच्या पानांचा रस प्यावा हा समज खोटा आहे. याचा अवलंब केल्याने जीवावर बेतू शकते. गेल्या काही वर्षांत कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा प्रसार वेगाने झाला आहे. या आजारात प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका देखील आहे. लोकांचा असा समज आहे की, डेंग्यू आणि कोरोना एकत्र होऊ शकत नाहीत. पण, हा समज खोटा ठरू शकतो. डॉक्टरांचे असे मत आहे की, हे दोन्ही आजार एकाचवेळी एका व्यक्तीला होऊ शकतात.
आपल्या देशात अनेक ठिकाणी आयुर्वेदीक उपचार करण्यावर भर दिला जातो. यामध्ये डेंग्यूवर उपचार प्रामुख्याने केला जातो. डेंग्यूच्या रुग्णाला पपईच्या पानांचा काढा दिला जातो. त्यामुळे वैद्यकीय उपचारही करावेत. डेंग्यू हा आयुष्यात एकदाच होतो असा समजही लोकांमध्ये पसरला आहे. पण, असे नाही. तुम्हाला एकदाच नाही तर अनेकदा डेंग्यूची लागण होऊ शकते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे.
डेंग्यू हा जीवघेणा आजार नसल्याचा अनेकांचा समज आहे. लोकांना असे वाटते की, यात फक्त ताप येतो आणि तो औषधाने बरा होऊ शकतो. डेंग्यू हा एक धोकादायक आजार आहे. तो टाळण्यासाठी त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. कोरोनापूढे डेंग्यू हा अतिसामान्य आजार वाटत असेल तरी डॉक्टर काळजी घ्यायला सांगतात. कारण, डेंग्यूमुळेही जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. डेंग्यूच्या काळात औषधांवर विश्वास ठेवा. शक्य होईल तेवढे द्रव पदार्थाचे सेवन करा. याशिवाय हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवनही डेंग्यूतून लवकर बरे करेल.
औषधेच करतील लवकर बरी
कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने रक्तातील पेशी कमी होऊन डेंग्यूचा त्रास अनेकांना झाला असेल. सध्या पावसाळा संपला असला तरी हिवाळ्याची चाहुल अनेक आजारही सोबत घेऊन येते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात डेंग्यूवर पपई न खाता औषधे घेणे अधिक फायदेशीर ठरेल.




