लोणावळा : पुणे मुंबई एक्सप्रेस रोड वरती बोर घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झाला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.




